vastu Consultancy
ID: #41845
Listed In : Business & Services Business Consultants Consultants
Business Description
' वास्तूशास्त्र ' हे विज्ञान शास्त्र आहे. विज्ञानशास्त्र कायम नैसर्गिक वस्तूंशी सूक्ष्म, अतीसूक्ष्म स्वरूपात संतुलन साधते. कोणत्याही वास्तूचा विचार करताना ब्रह्मतत्वाबरोबर, वैश्विक ऊर्जेपासून निर्मित ग्रह, नक्षत्र, पंचमहाभूते, सूर्यचंद्र, मनुष्यदेह, आत्मा, वगैरे गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड पुरुष अर्थात परमात्मा विश्वपुरुषाला म्हणजे नैसर्गिक प्रवृत्तीला सृष्टी निर्मितीसाठी पाठबळ देतो व विश्वपुरुष माणसाला पाठबळ देतो. त्याप्रमाणे माणूस वास्तूतील ब्रह्मस्थानाला अर्थात ऊर्जाकेंद्रबिंदुला उर्जित करून वास्तूपुरुषाला पाठबळ देतो व दाही दिशातून वास्तूला उत्कर्ष आणि समृद्धीचा शुभ आशिर्वाद प्राप्त करून घेतो.