Ambai Hotel
ID: #816561
Listed In : Hostels
Business Description
तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या शक्तिसामर्थाच्या कथा सर्वांना माहित आहेतच. अगदी पौराणिक काळापासून मातेचे महात्म्य कथन करणा-या कथा समस्त भक्तांना स्फुर्ती देउन जात असतात. मातेचे भक्त नेहमीच तिची आराधना मोठया भक्तिभावाने करतात आणि त्यांना तिच्या सामर्थ्याची प्रचिती पावलोपावली येत असते. पण तुळजापूरच्या तुळजाभवानीचा भक्तसंप्रदाय हा फक्त महाराष्ट्रा पूरता मर्यादित नक्कीच नाही. समस्त भारतात तुळजाभवानीच्या वेगवेगळया स्वरूपांची आराधना वेगवेगळया प्रकारे करण्यात येत असते. पण मातेच्या भक्तांबाबत आश्चर्य चकित करणारी एक कथा नेपाळच्या राजाच्या संधर्भात पण आहे. मग नेपाळच्या राजालाही तारणा-या भवानी मातेची ही कथा ही प्रत्येक भवानी भक्तानी जरूर जाणून घ्यावी अशीच आहे.